Lek Ladki Yojana 2025 | लेक लाडकी योजना पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे

Lek Ladki Yojana 2025 | लेक लाडकी योजना Maharashtra | Eligibility, Benefits, Online Apply, Form, Documents

Lek Ladki Yojana 2025 (लेक लाडकी योजना 2025)

2017 पूर्वीची महाराष्ट्र सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) सुरू करण्यात आली आहे. मुलीच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.

Lek Ladki Yojana Benifits (लेक लाडकी योजना - फायदे)

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात खालील टप्प्यांमध्ये एकूण ₹1,01,000 इतकी रक्कम मुलीला दिली जाते.

  • मुलीच्या जन्मानंतर ₹5,000
  • इयत्ता पहिली : ₹6,000
  • इयत्ता सहावी : ₹7,000
  • इयत्ता अकरावी : ₹8,000
  • 18 वर्षे पूर्ण झाल्यावर : ₹75,000

Lek Ladki Yojana Eligibility (लेक लाडकी योजना – पात्रता)

  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यातील असावे.
  • लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१,००,००० पेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थीचे कुटुंब पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक असावे.
  • लाभार्थी कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली १ किंवा २ मुली, किंवा एक मुलगा व एक मुलगी असल्यास त्या मुलीस ही योजना लागू होईल.

Lek Ladki Yojana Terms and Conditions (लेक लाडकी योजना अटी व शर्ती)

  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता/पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास — एक मुलगी अथवा दोन्ही मुली असल्यास दोन्ही मुलींना लाभ घेता येईल, परंतु त्या वेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असेल.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील. त्या वेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल.

Lek Ladki Yojana Documents (लेक लाडकी योजना – आवश्यक कागदपत्रे)

  • लाभार्थीचे जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न ₹१,००,००० पेक्षा जास्त नसावे) याबाबत तहसीलदार/संबंधित अधिकारी यांचा दाखला आवश्यक
  • लाभार्थीचे आधार कार्ड (पहिल्या लाभावेळी आधार कार्ड अनिवार्य नाही)
  • पालकांचे आधार कार्ड
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाांहकत प्रत
  • पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डची साक्षांकित प्रत
  • लाभार्थीचे मतदार ओळखपत्र (शेवटच्या लाभासाठी, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक)
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • माता/पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
  • अंतिम लाभावेळी मुलगी अविवाहित असल्याबाबत स्वघोषणा पत्र (१८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह झालेला नसावा)

Lek Ladki Yojana Form (लेक लाडकी योजना फॉर्म)

लेख लाडकी योजनेचा फॉर्म तुम्हाला खाली दिलेल्या दोन मार्गांनी मिळवता येईल :

  1. लेक लाडकी योजना फॉर्म ऑनलाइन लिंकवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे.
  2. खालील शासकीय कार्यालयांमधून प्रत्यक्ष जाऊन घेणे –     
  • ग्रामीण व नागरी बाल
  • विकास प्रकल्प अधिकारी
  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी
  • जिल्हा परिषद
  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
  • विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास

How to apply for Lek Ladki Yojana offline (लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया)

  1. सर्वप्रथम लेक लाडकी योजना फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढा किंवा वरील शासकीय कार्यालयातून घ्या.
  2. अर्जामध्ये आवश्यक सर्व माहिती भरून घ्या.
  3. अर्जासोबत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडा.
  4. पूर्ण भरलेला अर्ज व कागदपत्रे अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे तपासणीसाठी जमा करा.
  5. त्या तपासणीनंतर तुम्हाला पोचपावती देतील व सर्व अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवतील.
  6. संबंधित अधिकारी यादृच्छिक (Random) पद्धतीने काही क्षेत्रांची प्रत्यक्ष तपासणी करतील व लाभार्थी यादीला मंजुरी देतील.
  7. जर कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे अपूर्ण आढळले, तर अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्जदाराला लेखी कळवले जाईल. अर्जदाराने त्या सूचनेनंतर ९ महिन्यांच्या आत अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Lek Ladki Yojana Online Registration (लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया)

  1. लाभार्थ्याला स्वतःहून थेट ऑनलाइन अर्ज करता येत नाही.
  2. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन लाभार्थ्याने अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे जावे.
  3. त्या अधिकाऱ्यांमार्फत अर्ज ऑनलाइन भरला जाईल व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली जातील.
  4. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळेल.
  5. पुढे संबंधित अधिकारी अर्ज व कागदपत्रांची तपासणी करतील.
  6. सर्व माहिती योग्य असल्यास अर्ज डिजिटल स्वरूपात मंजूर केला जाईल व लाभार्थ्याला योजनेचा अंतिम लाभ मिळेल.

Lek Ladki Yojana – Frequently Asked Questions (FAQ) (लेक लाडकी योजना – वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

1. लेक लाडकी योजना किती मुलींसाठी लागू आहे?

👉 या योजनेत लाभ खालीलप्रमाणे दिला जातो –
• १ किंवा २ मुलींसाठी – जर त्या १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या असतील.
• एक मुलगा + एक मुलगी असल्यास – फक्त मुलगी पात्र ठरते.
• जुळ्या मुली जन्माला आल्यास – दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळतो.
• १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगा/मुलगी असेल व त्यानंतर मुलगी/जुळ्या मुली जन्मल्या, तरी योजना लागू राहते.

2. जर सुरुवातीचे काही टप्पे मिस झाले असतील, तर लेक लाडकी योजनेचा फायदा मिळतो का?

👉 हो, योजनेचा पुढील टप्प्यातील फायदा मिळतो. पण ज्या टप्प्यावर अर्ज केला नाही किंवा कागदपत्रे अपूर्ण होती, त्या टप्प्याचा हप्ता नंतर मिळत नाही.

3. लेक लाडकी योजनेची अंतिम तारीख किती आहे?

👉 सरकारी संकेतस्थळांवर व वृत्तांतांमध्ये अर्ज करण्याची कोणतीही अंतिम तारीख उल्लेखलेली दिसली नाही.

4. लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो का?

👉 थेट लाभार्थी स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकत नाही. पण अंगणवाडी सेविका किंवा मुख्यसेविकेच्या माध्यमातून अर्ज ऑनलाइन प्रक्रिया केली जाऊ शकते.

5. पहिल्या लाभावेळी (₹5000) आधारकार्ड अनिवार्य आहे का?

👉 जन्मानंतरच्या पहिल्या लाभासाठी (₹5000) मुलीचे आधारकार्ड आवश्यक नसते. पण पुढील सर्व लाभांसाठी (शाळेत प्रवेश, ११वी, १८ वर्षे) मुलीचे आधारकार्ड बंधनकारक आहे.

6. मुलीचे आई-वडील हयात नसतील तर लेक लाडकी योजनेचा फायदा मिळतो का?

👉 हो, मुलीचे आई-वडील नसले तरी तिचा कायदेशीर पालक अर्ज करून तिला योजनेचा पूर्ण लाभ मिळवून देऊ शकतो.

7. अनाथ आश्रमातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घेता येईल?

👉 अनाथ मुलींना लेक लाडकी योजनेचा पूर्ण लाभ मिळतो. पण अर्ज त्यांच्या कायदेशीर अभिभावकाने किंवा अनाथ आश्रम प्रमुखाने करावा लागतो आणि त्यासाठी अनाथत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

8. जर लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असेल पण बाहेरच्या राज्यात शिकत असेल, तर लाभ मिळतो का?

👉 हो, जर कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असेल व मुलीचे बँक खाते महाराष्ट्रात असेल, तर मुलगी बाहेरच्या राज्यात शिकत असली तरी लेक लाडकी योजनेचा लाभ मिळतो.

9. फॉर्म भरल्यानंतर जर काही चुका असतील तर त्या अर्जदाराला कशा कळतील?

👉 फॉर्म भरताना चूक झाल्यास ती प्रामुख्याने अंगणवाडी सेविका/कार्यालयीन अधिकारी थेट अर्जदाराला कळवतात – मोबाईल, ई-मेल किंवा प्रत्यक्ष बोलावून. त्यानंतर अर्जदाराने दुरुस्ती करून पुन्हा कागदपत्रे जमा करावी लागतात.

10. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज केलेला कसा ट्रॅक करता येईल?

👉 अर्ज सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका यांच्याकडून मिळालेल्या पोचपावतीवर अर्ज क्रमांक दिलेला असतो. त्याद्वारे त्यांच्याकडे चौकशी करता येते.

11. या योजनेसाठी अर्ज करताना कोणते शुल्क (fees) लागते का?

👉 नाही, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणे पूर्णपणे मोफत आहे.

12. लेक लाडकी योजनेचा शेवटचा लाभ (₹75,000) मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला असेल तर चालेल का?

👉 नाही. शेवटचा लाभ (₹75,000 – 18 वर्षे पूर्ण झाल्यावर) मिळवण्यासाठी मुलगी अविवाहित असणे बंधनकारक आहे. मुलीचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाल्यास अंतिम लाभ मिळणार नाही.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top