Bandhkam Kamgar Yojana (बांधकाम कामगार योजना)
Bandhkam Kamgar Yojana (बांधकाम कामगार योजना) अर्ज, पात्रता, कागदपत्रे, फायदे, अर्ज स्थिती आणि लाभार्थी यादी तपासण्याची माहिती येथे दिलेली आहे. या योजनेद्वारे नोंदणीकृत कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व वैद्यकीय मदत प्रदान केली जाते.
Bandhkam Kamgar Yojana Benefits ( बांधकाम कामगार योजना फायदे )
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना खालील विविध योजनांचा लाभ घेता येतो.
1) Social and Insurance Schemes (सामाजिक व विमा योजना)
- पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी ₹30,000
- व्यक्तिमत्त्व विकास पुस्तक संच
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
- अवजार खरेदीसाठी ₹ 5,000
2) Bandhkam Kamgar Scholarships (बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना)
- इ. 1 ली ते 7 वी – प्रति वर्ष ₹2,500
- इ. 8 वी ते 10 वी – प्रति वर्ष ₹5,000
- इ. 10 वी व 12 वी मध्ये 5० किंवा अधिक गुण मिळाल्यास ₹10,000
- इ. 11 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष ₹10,000
- पदवी अभ्यासक्रमासाठी प्रति वर्ष ₹20,000
- वैद्यकीय पदवीसाठी ₹1,00,000 आणि अभियांत्रिकी पदवीसाठी ₹60,000 प्रति वर्ष
- शासनमान्य पदविकेसाठी ₹20,000 आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ₹25,000
- संगणक शिक्षणासाठी शुल्काची प्रतिपूर्ती
3) Health Assistance Schemes (आरोग्य सहाय्य योजना)
- नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000 व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी ₹20,000
- गंभीर आजाराच्या उपचारासाठी ₹1,00,000 (आरोग्य विमा योजना लागू असल्यास)
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावावर 18 वर्षांपर्यंत ₹1,00,000 मुदत ठेव
- 75% अपंगत्व आल्यास ₹2,00,000
- व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी ₹6,000
- महात्मा फुले जन आरोग्य योजना
4) Financial Assistance Schemes (आर्थिक सहाय्य योजना)
- कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास ₹50,000
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹20,000
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी व ग्रामीण) आर्थिक सहाय्य – ₹2,00,000
- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी ₹10,000 (50–60 वर्षे वय मर्यादा)
- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा श्री. कामगाराच्या विधवा पत्नीस ₹24,000 (5 वर्षांसाठी)
- गृहकर्जावरील ₹60,000 पर्यंत व्याजाची रक्कम किंवा ₹2,00,000 अनुदान
Bandhkam Kamgar Yojana Registration (बांधकाम कामगार योजना नोंदणी प्रक्रिया)
- ऑनलाइन नोंदणीसाठी mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर “बांधकाम कामगार : नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक व त्याच्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक टाका.
- पहिल्या विभागात वैयक्तिक माहिती व आधारकार्डप्रमाणे पूर्ण पत्ता अचूक भरावा.
- कौटुंबिक तपशील विभागात फक्त आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांचा तपशील भरावा.
- नियोजक तपशील विभागात कामाचा तपशील भरावा. ठेकेदार, ग्रामसेवक किंवा नियोक्त्याने दिलेल्या प्रमाणपत्रावरून माहिती भरावी.
- समर्थन दस्तऐवज विभागात, पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड आणि 90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र संलग्न करावे.
- समर्थन दस्तऐवज विभागात, पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड आणि ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र संलग्न (attach) करावे.त्यानंतर तुम्हाला दस्तऐवज तपासणीसाठी उपलब्ध असलेली भेट देण्याची तारीख निवडावी लागेल.वरील दिलेली माहिती खरी असल्याचे मान्य करण्यासाठी बॉक्समध्ये टिचकी (✓) मारावी आणि “Save” बटणावर क्लिक करावे.त्यानंतर सुरुवातीला क्रमांकावर OTP येईल.
- OTP पडताळणी केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. त्या संदेशात तुम्हाला Acknowledgement Number मिळेल — तो निश्चितच जतन करून ठेवा.तसेच, फॉर्म सबमिट झाल्याची पुष्टी तुमच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवण्यात येईल.
- निवडलेल्या तारखेस सर्व मूळ कागदपत्रांसह संबंधित सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे. ठरविलेल्या दिवशी किंवा ठिकाणी अनुपस्थित राहिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
Bandhkam Kamgar Yojana Documents (बांधकाम कामगार योजना – आवश्यक कागदपत्रे)
सामान्य आवश्यक कागदपत्रे (All Schemes Common)
- कामगार मंडळाचे ओळखपत्र
- बँक पासबुक
- रहिवासी पुरावा (आधारकार्ड / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / शिधापत्रिका / ग्रामपंचायतीचा दाखला इ.)
1) Social and Insurance Schemes (सामाजिक व विमा योजना)
- पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी – विवाह नोंदणी प्रमाणपत्र/शपथपत्र
- व्यक्तिमत्त्व विकास – शाळेचे ओळखपत्र
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना – विहित नमुन्यातील हमीपत्र (written undertaking or declaration)
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – विहित नमुन्यातील हमीपत्र (written undertaking or declaration)
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना – मागणीपत्र (Request Letter)
- औजार खरेदी – हमीपत्र (written undertaking or declaration)
2) Bandhkam Kamgar Scholarships (बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना)
अतिरिक्त दस्तऐवज – शाळा/कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा (बोनाफाईड प्रमाणपत्र/शाळेचे ओळखपत्र)
- प्राथमिक शिक्षण (इ.1 ली ते 7 वी) – किमान 75% उपस्थितीचा शाळेचा दाखला
- माध्यमिक शिक्षण (इ.8 वी ते 10 वी) – किमान 75% उपस्थितीचा शाळेचा दाखला
- इ. 10 वी व 12 वी मध्ये50 किंवा अधिक गुण मिळाल्यास ₹10,000 – किमान 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्याचे गुणपत्रक
- उच्च माध्यमिक शिक्षण (इ.11 वी व 12 वी)- इयत्ता 10वी व 11वीचे गुणपत्रक
- स्नातक (पदवी / डिप्लोमा) – मागील वर्गाचे गुणपत्रक, चालू वर्षाची प्रवेश पावती / बोनाफाईड
- वैद्यकीय पदवी आणि अभियांत्रिकी पदवी – मागील वर्गाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र, चालू वर्षाची प्रवेश पावती / बोनाफाईड
- पदव्युत्तर / शासनमान्य अभ्यासक्रम – मागील वर्गाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र, चालू वर्षाची प्रवेश पावती / बोनाफाईड
- संगणक शिक्षण (MS-CIT) – MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती
3) Health Assistance Schemes (आरोग्य सहाय्य योजना)
- नैसर्गिक प्रसूतीसाठी / शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती – डॉक्टरांनी दिलेले शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र,वैद्यकीय उपचाराचे बिल/देयके,जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- कामगाराचा अपघाती मृत्यू – डॉक्टरांचा मृत्यू दाखला आणि मृत्यू कामावरच झाल्याचा पुरावा (FIR/नियोक्ता/ठेकेदाराचे प्रमाणपत्र)
- गंभीर आजारांचा उपचार – डॉक्टरांनी दिलेले आजाराचे प्रमाणपत्र / उपचार संबंधित कागदपत्रे
- कुटुंब नियोजन (मुलीच्या जन्मानंतर) – डॉक्टरांनी दिलेले शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आणि एकच मुलगी असल्याचा शपथपत्र
- 75% अपंगत्व – अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे
- व्यसनमुक्ती उपचार – सरकारी किंवा निमशासकीय केंद्रातून उपचार घेतल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र
- महात्मा फुले जन आरोग्य योजना – रेशन कार्ड
4) Financial Assistance Schemes (आर्थिक सहाय्य योजना)
- नैसर्गिक मृत्यू – मृत्यू दाखला
- अटल आवास योजना (शहरी/ग्रामीण) – प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र असल्याचे प्रमाणपत्र
- अंत्यविधी सहाय्य (वय 50-60 वर्षांदरम्यान) – मृत्यू दाखला
- विधवा सहाय्य – मृत्यू दाखला
- गृहकर्ज सहाय्य/व्याज परतावा – बँक कर्जाचे पुरावे, कर्ज विमा पावती, संयुक्त नोंदणीचे किंवा घर नसल्याचे हमीपत्र
How to Apply for Kamgar Yojana Schemes (कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा)
१) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- MAHABOCW पोर्टल ला भेट द्या व “बांधकाम कामगार: दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- “Select Action” मध्ये New Claim निवडा आणि बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला OTP टाकून पडताळणी करा.
- तुमचे प्रोफाईल उघडल्यानंतर सर्व माहिती योग्य आहे आणि नोंदणी स्थिती “Active” आहे याची खात्री करा. बँक तपशील विचारल्यास, तो नीट भरावा.
- योजना श्रेणी निवडा — जसे की सामाजिक कल्याण योजना/शैक्षणिक कल्याण योजना/आरोग्य योजना/आर्थिक योजना . त्यानंतर योग्य योजना निवडा.
- निवडलेल्या योजनेनुसार विचारलेले कागदपत्रे अपलोड करा आणि “Verify Documents” वर क्लिक करा.
- कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कामगार सुविधा केंद्र भेट देण्याची तारीख निवडण्यासाठी “Click to Load Visiting Dates” वर क्लिक करा आणि उपलब्ध तारीख निवडा.
- Submit बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पावती पोच क्रमांक मिळेल, तो नोंद करा.
- निवडलेल्या तारखेला सर्व मूळ कागदपत्रांसह कामगार सुविधा केंद्रावर भेट द्या.
2) ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- आपल्या जवळच्या MAHABOCW सुविधा केंद्राला भेट द्या.
- तुम्हाला हवी असलेली योजना निवडून त्यासाठीचा विशेष दावा अर्ज फॉर्म घ्या.
- फॉर्म अचूक माहितीने भरावा योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावीत.
- फॉर्म सुविधा केंद्रात जमा करा व अर्ज क्रमांकासह पावती मिळवा.
- अर्जाची स्थिती तपासण्यासाठी केंद्राला भेट द्या किंवा हेल्पलाईनवर कॉल करा.
Bandhkam Kamgar Yojana Form (बांधकाम कामगार योजना अर्ज फॉर्म)
बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनांचे सर्व अर्ज फॉर्म MAHABOCW पोर्टलवरील ‘डाउनलोड’ विभागातून सहज डाउनलोड करता येतात. ऑफलाइन अर्जासाठी हे फॉर्म वापरता येतात.
Bandhkam Kamgar Yojana List (बांधकाम कामगार योजना लाभार्थी यादी)
बांधकाम कामगार योजनेतील विविध योजनांचे लाभ वितरण तुम्हाला MAHABOCW पोर्टलवरील ‘लाभ वितरित’ मेनूमधील ‘विविध योजनांच्या लाभाचे वितरण’ या पेजवर पाहायला मिळेल. स्वतःचा लाभ तपासण्यासाठी जिल्हा, लाभार्थ्याचे नाव, बँक खाते क्रमांक व IFSC कोड भरावा लागतो.