Magel Tyala Saur Krushi Pump Yojana | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana (मागेल त्याला सौर कृषी पंप योजना) – Farmers using solar water pumps and solar panels under 90% subsidy scheme by Maharashtra government.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौर पंप 90% अनुदानावर दिले जातात. शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा संच दिला जातो. या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3, 5 व 7.5 (HP) क्षमतेचे कृषी पंप दिले जाणार आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढवणे व शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Magel Tyala Solar Pump Yojana Benifits | मागेल त्याला सौर पंप योजना – फायदे

  • ST/SC श्रेणीतील शेतकऱ्यांना फक्त 5 % रक्कम भरून आणि इतर शेतकऱ्यांना 10 % रक्कम भरून सौर संच आणि कृषी पंप मिळतो.
  • या योजनेअंतर्गत दिवसा सौर ऊर्जेवर वीज उपलब्ध असते, त्यामुळे सिंचनासाठी सतत पाणी उपलब्ध होते.
  • सौर ऊर्जेवर चालल्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल मोजावे लागत नाही, त्यामुळे मासिक खर्च वाचतो.
  • लोडशेडिंग आणि वीज कपातींपासून शेतकऱ्यांना मुक्तता मिळते, ज्यामुळे शेतीसाठी सतत पाणी मिळते.
  • सौर संचाची देखभाल खर्च कमी असतो आणि संचावर विमा/संरक्षण उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो.
  • ही यंत्रणा पर्यावरणपूरक आहे, कारण त्यात प्रदूषण कमी होते आणि नवीनीकृत सौर ऊर्जा वापरली जाते.

Magel Tyala Solar Pump Yojana – Beneficiary Selection Criteria | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना – लाभार्थी निवडीचे निकष

  • 2.5 एकरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 3 HP, 2.51 ते 5 एकर क्षेत्रासाठी 5 HP आणि 5 एकरवर अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप मिळेल. तसेच, पात्र शेतकऱ्यांना कमी क्षेत्रासाठीचा सौर पंपही मागणीनुसार दिला जाऊ शकतो.
  • शेतासाठी यापूर्वी वीज कनेक्शन नसलेले शेतकरीच या योजनेत पात्र ठरतील.
  • व्यक्तिगत किंवा सामुदायिक शेतीत, बोरवेल किंवा नदी/नाले यांच्या जवळील शेतकऱ्यांनाही योजना अंतर्गत पात्र ठरवले जाईल.
  • संबंधित पाणी स्त्रोताची खात्री आवश्यक असून, महावितरणाकडून पडताळणी केली जाईल. शेतकरी जलसंधारणाच्या पद्धतीने पाणी घेत असेल, तर तो या योजनेत पात्र ठरणार नाही.
  • अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2  आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना  लाभ न घेणारे लाभार्थी शेतकरी या योजनेत पात्र ठरतील.

Magel Tyala Solar Pump Yojana Required Documents | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना - आवश्यक कागदपत्रे

  • शेताचा 7/12 उतारा (जलस्त्रोताची नोंद आवश्यक आहे).
  •  शेतामध्ये अनेक भागीदार असल्यास इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला असणे बंधनकारक आहे.
  • आधारकार्ड
  • बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (ST/SC अनुसूचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी)
  • पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

Magel Tyala Solar Yojana Registration | मागेल त्याला सौर पंप योजना नोंदणी

ही योजना महावितरण कंपनीतर्फे राबवली जाते. या योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता.ऑफलाइन अर्जासाठी तुम्ही जवळच्या महावितरण कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करू शकता.

Magel Tyala Solar Yojana Online Registration | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना - ऑनलाइन नोंदणी

  1. महावितरण पोर्टल ला भेट द्या.
  2. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना वर क्लिक करा व इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडा.
  3. लाभार्थी सुविधा टॅबमध्ये “अर्ज करा” पर्याय मिळेल, त्यावर क्लिक केल्यास ऑनलाइन फॉर्म उघडेल.
  4. फॉर्ममध्ये खालील माहिती अचूकपणे भरावी लागेल:
    व्यक्तीगत व शेतजमिनीची माहिती (सर्व तपशील 7/12 उतार्यावरून मिळेल)
    – अर्जदाराचा पत्ता व ठिकाण
    – जलस्त्रोताची माहिती
    – शेतपिकाची माहिती
    – जर विद्यमान पंप वापरत असला, तर त्याचा तपशील
    – आवश्यक पंप तपशील
    – Booster Pump आणि Monopole – पाणी दाब वाढवण्यासाठी आणि सौर पॅनेल/उपकरणे उंचीवर बसवण्यासाठी आवश्यक घटक (जर आवश्यक असेल तर)
    – बँक तपशील
  5. त्यानंतर खालील कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करायची आहेत:
    – शेताचा 7/12 उतारा
    – बँक पासबुक प्रत
    – पासपोर्ट आकाराचा फोटो

    इतर कागदपत्रे (जर आवश्यक असेल)
    – जातीचे प्रमाणपत्र (ST/SC अनुसूचित जाती/जमाती लाभार्थींसाठी)
    – पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे
    – शेतामध्ये अनेक भागीदार असल्यास इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला
  6. Save and Next वर क्लिक केल्यास तुमची नोंदणी सुरक्षित होईल आणि तुम्हाला लाभार्थी आयडी (Beneficiary ID) मिळेल, जो तुम्हाला जतन करून ठेवावा लागेल.

Magel Tyala Solar Status Check | मागेल त्याला सौर पंप योजनेची अर्ज स्थिती तपासणे

  1. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना वर क्लिक करा व इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडा.
  2. लाभार्थी सुविधा टॅबमध्ये अर्जाची सद्यस्थिती पर्याय मिळेल.
  3. त्यावर क्लिक केल्यावर लाभार्थी आयडी (Beneficiary ID) एंटर करा.
  4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल.

Magel Tyala Solar Pump Yojana Payment | मागेल त्याला सौर पंप योजना पेमेंट किती व कसे करावे

  1. महावितरण पोर्टल वरील लाभार्थी सुविधा मेनूमध्ये देयकाची रक्कम भरणा करा हा पर्याय निवडा.
  2. लाभार्थी क्रमांक Enter करून तुम्ही पेमेंट करू शकता.
  3. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अर्ज आणि पेमेंट पावती मिळेल.
  4. तुम्हाला पंपाच्या क्षमतेनुसार खालीलप्रमाणे रक्कम भरावी लागेल :
पंप क्षमताकिंमत
General & OBCSC/ST
3 HP₹21,982₹10,991
5 HP₹30,694₹15,347
7 HP₹42,994₹21,497

Magel Tyala Solar Pump Vendor List | महावितरण लाभार्थी सुविधा पोर्टलवर अर्जाची स्थिती व Vendor निवड प्रक्रिया

  1. महावितरण पोर्टला भेट द्या व लाभार्थी सुविधा हा मेनू निवडा.
  2. अर्जाची स्थिती हा पर्याय निवडा व तुमचा लाभार्थी आयडी टाका. त्यानंतर तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती दिसेल.
  3. जर पेमेंट पूर्ण केलेले असेल, तर तुम्हाला Vendor Search हा पर्याय दिसेल. हा पर्याय उपलब्धता आणि कोट्यांनुसार कधी कधी विलंबाने दिसू शकतो.
  4. Vendor List मध्ये तुमच्या जवळचा Vendor निवडा. OTP verification पूर्ण झाल्यावर Vendor selection अंतिम होईल.
  5. Vendor निवडल्यानंतर Installation  प्रक्रिया साधारणपणे 2 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top