PM Surya Ghar Yojana 2025 | प्रधानमंत्री सूर्य घर योजना

PM Surya Ghar Yojana 2025 - Solar panels on rooftop providing free electricity and subsidy benefits.

PM Surya Ghar Yojana 2025 | पीएम सूर्य घर योजना 2025

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ही योजना भारत सरकारने लोकांना मोफत घरगुती वीज देण्याच्या हेतूने सुरू केलेली योजना आहे. या योजनेतर्गत लोकांना त्यांच्या घरावर सौर पॅनेल बसविण्यासाठी पॅनेलच्या खर्चाच्या 40% इतकी अनुदान (Subsidy) दिली जाईल. या योजनेमुळे सरकारचे ₹75,000 कोटी दरवर्षी वीज खर्चात बचत होईल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज देऊन 1 कोटी घरांना उजळविण्याचे सरकारचे ध्येय आहे.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana Benefits | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना - फायदे

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत खालील श्रेणींमध्ये अनुदान दिले जाते :

गृहस्थांसाठी अनुदान (Residential Households)

  • जर तुमचा सरासरी मासिक वीज वापर 0 ते 150 युनिट्स असेल तर तुम्हाला प्रति 1 किलोवॅट ₹30000 प्रमाणे अनुदान मिळेल. 1 किलोवॅटसाठी ₹30000 & 2 किलोवॅटसाठी ₹60000.
  • जर तुमचा सरासरी मासिक वीज वापर 150 ते 300 युनिट्स असेल तर: 2 किलोवॅटसाठी ₹60000 & 3 किलोवॅटसाठी ₹78000.
  • जर तुमचा सरासरी मासिक वीज वापर 300 युनिट्सपेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला फक्त ₹78000 इतकेच अनुदान मिळेल. कारण ही योजना गृहस्थांसाठी अनुदान (Residential Households) फक्त 3 किलोवॅटपर्यंतच अनुदान देते.

गृहनिर्माण सोसायटी / रहिवासी कल्याण संघासाठी अनुदान (GHS / RWA – Group Housing Society / Resident Welfare Association)

सरासरी मासिक वीज वापर (युनिट्स)योग्य सौर छतावरील प्लांट क्षमताअनुदान सहाय्य
0 – 1501 – 2 किलोवॅट₹30,000 ते ₹60,000
150 – 3002 – 3 किलोवॅट₹60,000 ते ₹78,000
> 3003 किलोवॅट पेक्षा जास्त₹78,000 (कमाल मर्यादा)
  • सरकार केवळ वैयक्तिक घरांनाच अनुदान देत नाही तर गृहनिर्माण सोसायटी आणि रहिवासी कल्याण संघटनांनाही (RWA) अनुदान देत आहे.
  • सामाईक सोयी-सुविधांसाठी प्रति किलोवॅट ₹18000 इतके अनुदान दिले जाते. या सामाईक सुविधांमध्ये लिफ्ट, पाणी पंप, कॉरिडॉर/स्ट्रीट लाईटिंग, सुरक्षा व्यवस्था तसेच ईव्ही चार्जिंग स्टेशन यांचा समावेश होतो.
  • या अनुदानाची कमाल मर्यादा 500 किलोवॅट क्षमता इतकी आहे. त्यामध्ये प्रति घर 3 किलोवॅट प्रमाणे क्षमता मंजूर केली जाते.

PM Surya Ghar Yojana Eligibility | पीएम सूर्य घर योजना पात्रता निकष

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • सोलर पॅनल बसविण्यासाठी घराच्या छतावर मालकी हक्क असणे आवश्यक.
  • अर्जदाराकडे वैध घरगुती वीज कनेक्शन असणे गरजेचे.
  • अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

PM Surya Ghar Yojana Documents | पीएम सूर्य घर योजना आवश्यक कागदपत्रे

  1. ओळखपत्र (Identity Proof)
    आधार कार्ड (Aadhaar Card)
    पॅन कार्ड (PAN Card)
  2. पत्ता पुरावा (Address Proof)
    वीज बिल (Electricity Bill)
    रेशन कार्ड / मतदान ओळखपत्र (जर आवश्यक असेल तर)
  3. बँक तपशील (Bank Details)
    पासबुकची पहिली पानाची प्रत / रद्द चेक (Cancelled Cheque) – सबसिडी जमा करण्यासाठी
  4. घर/मालकी हक्काचे कागद (Property Ownership Proof)
    7/12 उतारा / मालमत्ता कर रसीद (Property Tax Receipt)
    सोसायटीमध्ये असल्यास NOC (No Objection Certificate)

PM Surya Ghar Yojana Price List | सोलर बसविण्याचा एकूण खर्च

साधारणपणे सरकार सोलर पॅनेलवर 40% अनुदान (Subsidy) देते. त्या अनुदानानुसार महाराष्ट्रामध्ये सोलर बसविण्यासाठी खालीलप्रमाणे अंदाजे खर्च येऊ शकतो.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana Table
सोलर सिस्टीम आकार (in kW)अंदाजे किंमत (अनुदानापूर्वी)सरकारकडून मिळणारे अनुदानसबसिडीनंतरचा अंदाजे खर्च
1 kW₹75,000 – ₹85,000₹30,000₹45,000 – ₹55,000
2 kW₹1,50,000 – ₹1,70,000₹60,000₹90,000 – ₹1,10,000
3 kW₹1,89,000 – ₹2,15,000₹78,000₹1,11,000 – ₹1,37,000
4 kW₹2,52,000 – ₹2,85,600₹78,000₹1,74,000 – ₹2,07,600
5 kW₹3,15,000 – ₹3,57,000₹78,000₹2,37,000 – ₹2,79,000

PM Surya Ghar Yojana Registration | पीएम सोलर योजना अर्ज प्रक्रिया

पीएम सोलर योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. खालील स्टेप्स फॉलो कराव्यात :

स्टेप 1

  • पीएम सूर्य घर पोर्टल  ला भेट द्या.
  • Consumer Page ऑप्शनवर क्लिक करून  “Apply Now” निवडा किंवा Login ड्रॉपडाउन मेनूमधून “Consumer Login” निवडा.

स्टेप 2

  • ग्राहकाचा मोबाईल नंबर टाकून आलेला OTP Verify करा.

स्टेप 3

  • लॉगिन केल्यानंतर नोंदणीसाठी प्रोफाइलमध्ये नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पत्ता, जिल्हा, पिनकोड ही माहिती भरून Save करा.

स्टेप 4

  • नोंदणी झाल्यानंतर ग्राहकाला Vendor कडून अर्ज भरायचा आहे की स्वतः भरायचा आहे याचा पर्याय दिसेल. जर स्वतः अर्ज करायचा असेल तर “Apply for Solar Rooftop” निवडा. नंतर राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनी, वीज ग्राहक क्रमांक (लाइट बिलवर असतो) टाकून Fetch Details करा व Next वर क्लिक करा.
  • महावितरण ग्राहक क्रमांकावरून तुमचे नाव, पत्ता, वीज वितरण कंपनीचे तपशील आपोआप भरले जातील.
    त्याव्यतिरिक्त खालील माहिती भरावी लागेल :
    अर्जदाराची माहिती – लिंग, ई-मेल आयडी, पिनकोड, ठिकाणाचा प्रकार (शहरी/ग्रामीण), स्थानिक संस्था नाव.
    वीज वितरण कंपनीची माहिती – ही माहिती तुमच्या ग्राहक क्रमांकावरून आपोआप भरली जाईल. मागील बिलातील युनिट्सच्या आधारावर Sanction Load (kW मध्ये) दर्शवले जाईल.
    सोलर रूफटॉप माहिती – येथे तुम्हाला Residential किंवा Group Housing Society/Resident Welfare Association निवडायचे आहे. तसेच तुमच्या वीज युनिटनुसार हवी असलेली Proposed Solar Capacity टाकायची आहे.
    दस्तऐवज अपलोड करणे – येथे Give up Subsidy वर क्लिक केल्यास तुम्ही शासनाकडून मिळणारी सबसिडी नाकारत आहात असे समजले जाईल. सबसिडी मिळवायची असेल तर “Give up Subsidy” वर क्लिक करू नये.
  • त्यानंतर “I agree with Net Metering Agreement” वर क्लिक करून अटी मान्य कराव्यात व अर्ज सबमिट करावा.

स्टेप 5

  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर व मंजुरी मिळाल्यावर तुम्हाला Vendor  निवडण्याचा व बँक तपशील भरण्याचा पर्याय मिळेल.
  • याच बँक खात्यावर तुमची सबसिडी जमा केली जाईल.

स्टेप 6

  • सोलरचे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर Vendor इंस्टॉलेशनचे तपशील ग्राहकाकडे सादर करतो आणि पुढे वीज वितरण कंपनीकडे (DISCOM) पाठवतो.

स्टेप 7

  • DISCOM सोलर इंस्टॉलेशनची तपासणी करून त्याचे तपशील ग्राहकाला कळवते.
  • त्यानंतर  तो राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणी संस्था (NPIA) कडे पाठवला जातो.
  • NPIA सबसिडी थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करते.

Steps to Check Subsidy Status | सबसिडी स्टेटस कसे तपासावे

  1. सर्वप्रथम पीएम सूर्य घर पोर्टल या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे लॉगिन करा.
  3. लॉगिन केल्यानंतर “My Application” मेन्यूमध्ये जा.
  4. तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची व सबसिडीची स्थिती (Status) दिसेल.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न

1. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो का?

फक्त घरगुती ग्राहक आणि गृहनिर्माण सोसायट्या अर्ज करू शकतात.

2. भाडेकरू या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?

हो, पण दोन अटी आहेत :
• वीज बिल भाडेकरूच्या नावावर असावे.
• छतावर सोलर बसवण्यासाठी घरमालकाची परवानगी असावी.

3. या योजनेसाठी कर्ज उपलब्ध आहे का?

हो, अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला कर्जाचा पर्याय उपलब्ध होतो.

4. अर्ज विक्रेत्याकडून भरू शकतो का?

हो, नोंदणी केल्यानंतर तुम्ही स्वतः अर्ज भरू शकता किंवा नोंदणीकृत विक्रेत्याकडून भरून घेऊ शकता.

5. अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

बँक संबंधित कागदपत्रे जसे की रद्द केलेला चेक किंवा पासबुकची प्रत व अर्जदाराच्या नावावरचे वीज बिल. पासबुक व वीज बिलावरील नाव एकसारखे असणे आवश्यक आहे.

6. छतावरील सोलर बसवण्यासाठी विक्रेता कसा निवडावा?

PM Surya Ghar Portal वर नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी उपलब्ध आहे. त्यातून आपल्या भागातील विक्रेता निवडू शकता.

7. Give Up Subsidy Option म्हणजे काय?

हा पर्याय म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ न घेण्याची निवड करणे होय.

8. सोलर खर्चासाठी कर्ज कसे मिळवू शकतो

National Portal हा Jan Samarth Portal शी जोडलेला आहे. ग्राहक Portal वर Login केल्यानंतर कर्जासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध होतो

9. Loan Option Residential आणि RWA (Society) दोन्हींसाठी आहे का?

नाही, Loan Option फक्त Residential Category साठी उपलब्ध आहे.

10. अनुदान वगळता प्रत्यक्ष खर्च किती येतो?

साधारण अंदाजे खर्च (Subsidy न धरता)
• 1 kW = 50000 रुपये
• 2 kW = 100000 रुपये
• 3 kW = 123000 रुपये
हा खर्च प्रदेशानुसार बदलू शकतो.

11. किती सोलर क्षमतेसाठी अर्ज करू शकतो?

किमान 1 kW पासून जास्तीत जास्त आपल्या वीज जोडणीच्या (Sanctioned Load) मर्यादेपर्यंत अर्ज करता येतो.
गृहनिर्माण सोसायट्या प्रति घर 3 kW आणि एकूण 500 kW पर्यंत अर्ज करू शकतात.

12. योजनेसंबंधी तक्रार कशी नोंदवावी?

तुम्ही PM Surya Ghar Portal वर Grievance मेनूमधून तक्रार नोंदवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top